शेतकऱ्यांची 4 थी यादी जाहीर! 6000 बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी ह्या दोन योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत १६व्या हप्त्यापोटी प्रत्येक शेतकऱ्याला २००० रुपये मिळतील.

तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी २००० रुपये असे एकूण ४००० रुपये मिळतील. म्हणजे दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एकूण ६००० रुपयांचा लाभ मिळेल. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी या योजनांसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांअंतर्गत एकूण १९४३.४६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

२०२३-२४ पासून पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळेल. राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी १७१२ कोटी रुपये दिले जाऊन आहेत. २०२३-२४ मध्ये उर्वरित दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांच्या एकूण ३८०० कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये एक महत्त्वाची योजना जाहीर केली होती. ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबविण्यात आली आहे. या योजनेच्या निकषानुसार, पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येक वर्षी एकूण ६ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात भर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मदत होते.

या योजनेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यातील १.१३ कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यात २७,६३८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ही मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालून त्यांना आर्थिक सक्षमीकरणास मदत करीत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करत आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top